महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल आता कंगनाविरोधात विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल!

मुंबई (जीवन तांबे) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल आता कंगनाविरोधात तक्रार विक्रोळी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील युद्ध कमी होण्याऐवजी तीव्र झाले आहे. सध्या वादग्रस्त ठरलेल्या कंगना राणावत हिने

उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटते, तुम्ही माझे घर माफिया मार्फत फोडून मोठे सूड घेतले आहे.  आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अभिमान तुटेल ... उद्धव ठाकरे हे काळाचे चाक आहे, नेहमीच असे नसते. काश्मिरी पंडितांवर काय घडेल हे आज मला कळले आहे. आज मी देशाला वचन देतो की मी काश्मीरवर एक चित्रपट तयार करीन आणि माझ्या देशवासियांना जागे करीन. असा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
 
या प्रकणाशी उद्धव ठाकरे यांचा संबंध नसताना देखील  कंगना राणावत हिने आक्षेपार्ह शब्द वापरले असल्याने  वकील नितीन माने यांनी कंगनाची विरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बांधकाम तोडण्याशी कुठलाही थेट संबंध नसताना तरी सुद्धा कंगना हिने ट्विटवर व्हिडिओ अपलोड करून मुख्यमंत्र्यांवर आरोप करून बदनामी केली आहे.  याप्रकरणी विक्रोळी कोर्टातही अब्रूनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याची माहिती वकील नितीन माने यांनी दिली आहे


संबंधित पोस्ट