सावंतवाडी संस्थान मराठा समाजाच्या संकेत स्थळाचा शुभारंभ

मुंबई (प्रतिनिधी) : सावंतवाडी संस्थान मराठा समाज, दादर , मुंबई या संस्थेच्या संकेत स्थळाचा शुभारंभ नुकताच, स्टार मॉल मधील संस्थेच्या कार्यालयात, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त- सतीश सावंत यांच्या हस्ते संकेत स्थळाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी- शशिकांत गावडे, किशोर सावंत, प्रभाकर परब, नरेंद्र सावंत, दिलीप दळवी, राजेंद्र परब व विजय (बाळ) पंडित उपस्थित होते.
          
संस्थेला ९२ वर्षांचा इतिहास आहे. मुंबईत दादर पश्चिम तेथे स्टार मॉल येथे, वातानुकूलीत हॉल असून मोठे मुख्य कार्यालय आहे.
            
सिंधुदुर्ग- कुडाळ येथे, वातानुकूलीत हॉल, तीन वर्गाची बालवाडी, गरीब मुलांसाठी वसती गृह व शॉपिंग सेंटर आहे. सावंतवाडी येथेही मुलांचे वसतिगृह आहे. संस्था गुणवंत विद्यार्थी व सभासदांचा सत्कार, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, गरजूना आरोग्यासाठी निधी दिली जाते. गेली चाळीस वर्षे संस्थे मार्फत वधू-वर सुचक केंद्र सुरू केले असून वेळोवेळी वधू-वर मेळावे घेत असते. वधू-वरा साठी अद्ययावत संकेत स्थळ असून, ऑल लाईन नोंदणी केली जाते.
          
 संसत्वेचे हे ९३ वे वर्ष असून, शताब्दी वर्षा कडे घोडदौड सुरू आहे. संस्थेच्या अधिक माहिती साठी व वधू-वरा च्या नाव नोंदणी साठी  संस्थेच्या.  www.ssmsvivahmandal.com  या संकेत स्थळाला भेट द्यावी असे कार्यकारी विश्वस्त - सतिश सावंत यांनी आवाहन केले आहे.

संबंधित पोस्ट