कंगना राणावत हिच्या मुंबईतील बांद्रा कार्यालयातील अनधिकृत बांधकावर पालिकेचा हातोडा!

मुंबई (जीवन तांबे) : पाक व्याप्त काश्मीर मुंबईला बोलल्याबद्दल कंगना राणावत ही वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याने मुंबई पालिकेने आज तिच्या पाली हिल कार्यलयातील  अनधिकृत बांधकामावर तोडक   कारवाई  सुरु केली आहे.

कंगना राणावत हिने बांद्रा पाली हिल येथील २०१७ रोजी हा बंगाला विकत घेऊन त्याला दुरुस्तीच्या नावाखाली व्यवसायिक करीत बेकायदा काम केले होते.

कार्यालयातील तळमजल्यावर अनधिकृत बांधकाम तोडण्यास आज कारवाई सुरू केली आहे.
कार्यलयाबाहेर मोठा पोलीस, पालिका यांचा मोठ्या प्रमाणात  फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. पालिकेचे एकूण ५० पेक्षा अधिक कामगार बुलडोझर, जेसीबी, हातोडा, फावडा, कुदळ घेऊन ही तोडक कारवाई करीत आहे.

हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचा खर्च पालिका कंगनाकडून वसूल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ही पालिका करीत असलेली कारवाई त्वरित थांबवण्याकरिता

कंगणाच्या वकिलाने न्यायालयात धाव घेऊन हे बांधकामावर तोडक कारवाई करू नये अशी मागणी केली आहे.

मात्र कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणी करण्यात आली आहे.अभिनेत्री कंगना राणावत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे

न्यायालयाने पालिकेने सूरु केलेली तोडक कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे

संबंधित पोस्ट