रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटकतर २५ बॉलिवूड सेलिब्रिटी चौकशीसाठी फेऱ्यात अडकणार
- by Reporter
- Sep 08, 2020
- 332 views
मुंबई (प्रतिनिधी) : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी होत होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली जाणार आहे. आज सकाळी १०.३० वाजल्यापासून एनसीबी रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल १३ तास रियाची चौकशी झाली.
मागील दोन दिवसांपासून रियाचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. मंगळवारचा रियाची चौकशी होण्याचा हा तिसरा दिवस. चौकशीच्या याच सत्रांतून समोर आलेल्या माहितीनुसार आता रियानं एका महत्त्वाच्या गोष्टीची कबुली दिली आहे. आपण BUD ने भरेलली सिगरेट ओढायचो हे तिनं कबुल केल्याचं म्हटलं जात आहे. याचा अर्थ रिया गांजाची सिगरेट ओढत होती. सुशांतसोबत ही सिगरेट ओढत असल्याची कबुली तिनं दिली.
रियाच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेल्या काही उपकरणांमुळं हा खुलासा होऊ शकता आहे. एनसीबीनं रियाच्य घरातून तिचा जुना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब अशा गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. ज्यांच्या फॉरेंसिक चाचणीत ही माहिती समोर आली.
ड्रग्स प्रकरणात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने डोजियर तयार केले आहे. यात २५ बॉलिवूड कलाकारांची नावे आहेत. हे डोजियर एनसीबी एसआयटीने तयार केले आहे. या यादीमध्ये सेलेबल्सची नावे ए, बी आणि सी प्रकारात समाविष्ट करण्यात आली असून लवकरच एनसीबी बॉलिवूडमधील या कलाकारांना बोलवणार आहे. रिया-शोविक, ड्रग्ज पॅडलर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केल्यानंतर ही यादी तयार केली गेली आहे, अशी माहिती आज तकने दिली आहे.
रिपोर्टर