वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी चौकशीअंती कारवाई करणार गृहमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यांच्या निवेदनास उत्तर देताना गृहमंत्री श्री.देशमुख बोलत होते. यावेळी सदस्य सुनिल प्रभू, ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांनीही गुन्हेगारास तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

संबंधित पोस्ट