फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने कलाकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर

मुंबई (प्रतिनिधी) : नितीन नांदगावकर यांची भेट घेऊन मुंबई मध्ये स्थापन झालेल्या शिखर महासंघटना "फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र" या महा संघटनेच्या वतीने कलाकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मुंबई आणि महाराष्ट्रातील निर्माते, लाईट साऊंड तंत्रज्ञ , गायक , गायिका , संगीत संयोजक , वादक , निवेदक , मिमीक्री , नृत्यांगना , कोरियोग्राफर , लोकशाहीर , लोक कलावंत , बॅकस्टेज कामगार , डोअरकिपर. हिंदी मराठी कव्वाल , नाशिक ढोल , बॅन्जो पार्टी, नाट्य कलावंत ,  सिनेकलावंत , दशअवतार , ब्रासबॅन्ड , वाघ्यामुरळी , भारुडी , गोंधळी अशा सर्व प्रकारच्या कलाकारांच्या संघटनांनी एकत्र येऊन "मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना सादर करण्यासाठी

सर्व निमंत्रकांनी लोकशाही पद्धतीने एकत्र येऊन फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने कलाकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन मा.नितीनजी नांदगावकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले , अशी माहिती सुप्रसिद्ध अभिनेत्री लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट