कंगनाला मोहरा करून मुंबईला वेगळे,पाडण्याचा डाव तर शिजत नाहीना!
- by Reporter
- Sep 07, 2020
- 389 views
मुंबई: अधून-मधून "मुंबई" च्या बाबतीत नको ती विधाने करून वातावरण तापविले जाते.तसेच मुंबई पोलिसांना टार्गेट केले जाते.मुंबई केंद्रशासित करण्याचे मनसुबे रचले जातात. बरीच टिवटिव केली जाते.१०६ हुतात्म्यांनी आपल्या जीवाचे बलिदान करत,मुंबईसह महाराष्ट्र मिळविला आहे मुंबईचे शल्य काही उपऱ्यांच्या मनात आजही सलते आहे. मराठी भाषिकांच्या राज्यात पाहुण्यासारखे राहणारे मराठी माणसांच्या विरोधात केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी नको तो चिवचिवाट करत असतात;आणि फंदफितुरी करणारे काही मराठीच त्यांना खतपाणी घालत असतात. आताही कंगना राणावत हीच्या विधानामागे कोणत्या प्रवृत्तीचा हात आहे. याचा शोध घेतला गेला पाहिजे. कारण तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळे करून केंद्रशासित करण्याचा,मुंबईची कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न तर करीत नाही ना!कारण कंगणा एक मोहरा असावा.असे मत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईसह महाराष्ट्राचे अखंडत्व राहण्याकरता मराठी भाषिक,मराठी माणसांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून एका विचाराने एकत्र रहाणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावत नको ती गरळ ओकणाऱ्या व अशांना मदत करणाऱ्यांना,वेगळी भुमिका घेणाऱ्यांना, व्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरविणाऱ्यांना,छुपे राजकारण खेळणाऱ्यांना वेळीच आवर घालणे ही काळाची गरज आहे.म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावता कामा नये.अशी भावना दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केल अधून-मधून "मुंबई" च्या बाबतीत नको ती विधाने करून वातावरण तापविले जाते.तसेच मुंबई पोलिसांना टार्गेट केले जाते.मुंबई केंद्रशासित करण्याचे मनसुबे रचले जातात. बरीच टिवटिव केली जाते.१०६ हुतात्म्यांनी आपल्या जीवाचे बलिदान करत,मुंबईसह महाराष्ट्र मिळविला आहे मुंबईचे शल्य काही उपऱ्यांच्या मनात आजही सलते आहे. मराठी भाषिकांच्या राज्यात पाहुण्यासारखे राहणारे मराठी माणसांच्या विरोधात केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी नको तो चिवचिवाट करत असतात;आणि फंदफितुरी करणारे काही मराठीच त्यांना खतपाणी घालत असतात. आताही कंगना राणावत हीच्या विधानामागे कोणत्या प्रवृत्तीचा हात आहे. याचा शोध घेतला गेला पाहिजे. कारण तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळे करून केंद्रशासित करण्याचा,मुंबईची कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न तर करीत नाही ना!कारण कंगणा एक मोहरा असावा.असे मत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईसह महाराष्ट्राचे अखंडत्व राहण्याकरता मराठी भाषिक,मराठी माणसांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून एका विचाराने एकत्र रहाणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावत नको ती गरळ ओकणाऱ्या व अशांना मदत करणाऱ्यांना,वेगळी भुमिका घेणाऱ्यांना, व्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरविणाऱ्यांना,छुपे राजकारण खेळणाऱ्यांना वेळीच आवर घालणे ही काळाची गरज आहे.म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावता कामा नये.अशी भावना दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.
रिपोर्टर