
चोरीच्या उद्देशाने एका वृद्ध महिलेची हत्या! सीसीटीव्ही फुटेज द्वारे कुर्ला नेहरू नगर पोलिसांनी आरोपीला केली अटक!
- by Reporter
- Sep 07, 2020
- 1191 views
मुंबई (जीवन तांबे) : चोरीच्या उद्देशाने पुतण्याने काकीची हत्या करून घरातील दागिने घेऊन फरार झाला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
इरफान शेख असे अटक केलेल्या आरोपी चे नांव आहे.
कुर्ला येथील जागृती नगर परिसरातील वर्षा सोसायटी बी विंग मध्ये रहात असलेले जरीना अन्वर शेख वय - ६० हिला घरात एकटे असल्याचे पाहून च्या उद्देशाने तिचा पुतण्या ता.०६ सप्टें रोजी रात्री ठीक. ११:३० सुमारास तिचा पुतण्या घरात घुसून तिची कोणत्या तरी हत्याराने हत्या केली.
आरोपीने तिच्या घरातील कपाटातील व अंगावरील एकूण ५,७०,०००/- हजार रुपये किमतीचे १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून फरार झाला आहे.
तिची मुलगी घरी येताच आई मृत्यू अवस्थेत पडलेली आढळल्याने तिने लगेच नेहरू नगर पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत्यू महिलेला राजावाडी रुग्णाला दाखल केले.
पोलिसांनी मृतदेहाचा मरणोत्तर पंचनामा आज अपमृत्यू क्रमांक ३३/२० अन्वये नोंद केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास करीत असल्याचे नेहरू नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी सांगितले.
रिपोर्टर