मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
- by Reporter
- Sep 07, 2020
- 733 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त मातोश्री निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात राजे उमाजी नाईक यांचे मोठे योगदान होते. त्यांनी 'स्वातंत्र्याचा जाहीरनामा' काढून अनेक घटकांना संघटीत करण्याचे प्रयत्न केले. ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले. अशा या महान आद्यक्रांतीवीरास विनम्र अभिवादन.
रिपोर्टर