मुख्यमंत्र्यांना ठार मारू मातोश्री निवास्थान बॉम्बने उडवून देऊ दाऊदच्या हस्तकाची धमकी
- by Reporter
- Sep 07, 2020
- 813 views
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकानं दिली आहे. या घटनेनंतर मातोश्री परिसरात धावपळ उडाली आहे. मातोश्रीवर दुबईतून चार कॉल आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे मातोश्री बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ४ फोन काॅल दुबईच्या नंबरवरून आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलिस आॉपरेटरने घेतले होते.कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलिस सुरक्षा कमी केली होती. मात्र आता दुबईहून आलेल्या धमकीच्या फोन कॉल नंतर ठाकरे कुटुंबाची सुरक्षा पुन्हा वाढवण्यात आली आहे.

रिपोर्टर