
गोवंडी येथील डंपिंग ग्राउंड जवळील खाडीत तरूणाचा बुडून मृत्यू!
- by Reporter
- Sep 07, 2020
- 824 views
मुंबई (जीवन तांबे) : रियाज खान हा तरूण शुक्रवारी पासून बेपत्ता असल्याने याबाबत त्याच्या भावाने शनिवारी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र त्याचा मृतदेह डंपिंग ग्राऊंड येथील खाडीत आढळला आहे.
शुक्रवारी घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडून घरी परतल्याने त्याच्या रियाज खान यांच्या भावाने शोध सुरू केला परंतु तो सापडला नाही.
रियाज हा आपल्या सात मित्राबरोबर शुक्रवारी डंपिंग ग्राऊंड येथील खाडी ओलांडून गोदरेज कंपनीच्या परिसरात गेला होता.
संध्याकाळी मित्रांसह कचरा गोळा करून घेण्याकरिता खाडीतून येत असताना भरतीची वेळ असल्यामुळे खाडीत खूपच पाणी होते. त्याचे मित्र त्या पाण्यातून पलीकडे आले मात्र रियाजला पोहता येत नसल्यामुळे तो बुडाला.
याबाबत त्याच्या कुटुंबाला माहिती दिल्यास आपल्या विरोधात पोलिसात तक्रार करतील या भितीने त्यांनी कोणालाही माहीती दिली नाही.
शनिवारी त्याचा मृतदेह आढळला वर तो स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. शिवाजी नगर पोलिसांनी त्याच्या मृत्यूची नोंद करून पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पाठवून मित्रांची कसून चौकशी करीत आहे.
रिपोर्टर