मुलुंडमध्ये स्व. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिकांनी वाहिली आदरांजली

मुलुंड (शेखर भोसले) शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वर्गीय पत्नी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त मुलुंडमध्ये आज त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम मुलुंडमधील प्रत्येक शाखेत आयोजित करण्यात आला होता. ईशान्य मुंबई विभाग संघटिका संध्या वढावकर यांनी प्रत्येक शाखेला भेट देवून मीनाताई ठाकरे यांना यावेळी आदरांजली वाहिली. तसेच महिला व पुरुष उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख शाखा संघटिका, सर्व शिवसैनिकांनी व नागरिकांनी देखील मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस यावेळी आदरांजली वाहिली

संबंधित पोस्ट