तहसीलदार कार्यालयाचा नामनिर्देश फलक रामभरोसे स्थितीत.. अपघाताची शक्यता

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पश्चिम येथील तहसीलदार कार्यालयाचा नामनिर्देश फलक हा सध्या लटकलेल्या स्थितीत असून कधीही खाली पडू शकतो अश्या दुरावस्थेत आहे. या कार्यालयात रोज शेकडो नागरिक तसेच जज, वकील, अधिकारी व कर्मचारी वर्ग ये-जा करत असतो. त्यामुळे हवेच्या जोराच्या झोक्यात हा फलक पडून अपघात घडून येथे येणार्या नागरिकांच्या व कर्मचारी वर्गाच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो.

तहसीलदार संदीप थोरात यांना या फलकाची दुरावस्था नजरेत आणून दिली असता त्यांनी सांगितले की, "पीडब्लूडी ला सांगितले असून सोमवारी या खात्याचे कर्मचारी हा फलक व्यवस्थित बसवतील. सध्या या फलकाला दोरीने बांधून ठेवले आहे

संबंधित पोस्ट