मुलुंड पूर्वेला चोरट्याने महिलेचे दागिने लुटून केला पोबारा
- by Reporter
- Sep 05, 2020
- 507 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पूर्वेत एका महिलेला बोलबच्चन गँगने लुटल्याची घटना समोर आली असून तिच्याकडून हजारो रुपयांचा ऐवज लंपास करून तेथून पळ काढण्यात ही गँग यशस्वी झाली आहे. मुलुंड नवघर पोलिस या अज्ञात लुटारूंचा शोध घेत आहे.
गव्हाणपाडातील एकता सोसायटीत राहणाऱ्या सुमारे ४५ वर्षांची महिला दुकानात असलेल्या तिच्या पतीला चहा घेवून जात असता दुचाकीवरून आलेल्या एकाने तिच्या जवळ मोटर सायकल थांबवत पुढे पोलिसांनी नाकाबंदी केली असून ते सर्व नागरिकांची तपासणी करत असल्याची बतावणी केली. जर तुमच्या अंगावरील दागिने त्यांनी पाहिले तर त्यांना संशय येईल की हे चोरीचे दागिने आहेत. ते दागिने काढून तुम्ही एका पिशवीत ठेवा, असे त्या महिलेस सांगितले. महिलेने तसें करताच त्या चोरट्याने हातचलाखीने तिचे दागिने काढून घेतले. काहीवेळाने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने नवघर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार महिलेने अज्ञात इसमाच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला असून पोलिसांनी या चोरट्याला पकडण्यासाठी तपास चालू केला आहे.
रिपोर्टर