ई पास रद्द करण्यात आल्याने मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
- by Reporter
- Sep 05, 2020
- 405 views
मुलुंड (शेखर भोसले) : पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड टोलनाक्याजवळ सध्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनलॉक ४ मध्ये ई पास रद्द करण्यात आल्यानंतर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱया वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ़ झाल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे तर दुसऱ्या बाजूला ठाण्याच्या दिशेने जाणाऱया वाहनांची देखील रस्त्यावरील खड्यांमुळे व कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम चालू असल्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.
गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा वेग येथे मंदावला जात असून काही मीटरचे अंतर कापण्यासाठी बऱ्याच वेळ जात असल्याचे काही वाहनचालकांनी सांगितले. ठाण्याच्या दिशेने जाणाऱया रस्त्यावर टोल नाक्याच्या पुढेच मोठया प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने वाहतुकीचा वेग येथे खूपच कमी होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत त्यातच थोडे पुढे गेले की कोपरी पुलाचे काम चालू असल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून संध्याकाळी गर्दीच्या वेळेत वाहतूक जाम होताना दिसत आहे.
रिपोर्टर