
शालेय शुल्क राज्य सरकारने माफ करावे या मागणी करिता धारावी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्र्याच्या कार्यालयासमोर एल्गार
- by Reporter
- Sep 05, 2020
- 1413 views
मुंबई (जीवन तांबे) : लॉकडाऊनमुळे सामान्य समोर आर्थिक संकट उभे राहिले असताना ऑनलाइन शिक्षणाच्या नांवाखाली शाळा पालकांकडून भरमसाठ शुल्क आकारत आहे.
हे शुल्क भरणे पालकांना डोईजड होत आहे. शाळा ही शुल्क भेण्याकरिता पालकांकडे तकदा लावत आहे. हे शुल्क सामान्य पालकांना भरणे शक्य नसल्याने राज्य सरकारने हे शुल्क माफ करावे या मागणी करिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धारावी ९० फिट मार्गावरील मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. घरात दोन मुले शिक्षण घेत असतील
त्याच्या करिता मोबाईल घ्यावा लागत आहे. तसेच मोबाईल डेटा वर खर्च ही करावा लागत आहे. लॉकडॉऊन काळात घरात अन्न खाण्यास पैसे नसताना ऑन लाईनवर पालकांना खर्च करावा लागत आहे.यातच शाळांनी शुल्क भरण्याचा तकदा लावला आहे.
शिक्षण मंत्री पालकांना दिलासा देत नसल्याने हे आमरण उपोषण करण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शालेय शुल्क पालकांना माफ करावे या मागणी करिता धारावी तालुका वंचित आघाडीच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमरण उपोषणाला बसले आहेत. मनिहार इकबाल, विनोद जैस्वार , नवीन मुगेश, सुनील कांबळे, सुषमा सोहनी व चेंबूर तालुका अध्यक्ष हरीश काशीद आमरण उपोषणाला बसले आहेत.
रिपोर्टर