पेटीएमने पेमेंट केल्याचा बनाव करून गंडा प्रकरणी पाच जणांना ओशिवरा पोलिसांनी केली अटक! दोन आरोपींना कोरोनाची लागण!
- by Reporter
- Sep 05, 2020
- 458 views
मुंबई (जीवन तांबे) : सिगारेट खरेदी नंतर पेटीएमने पैसे दिल्याचा खोटा मेसेज पाठवून गंडा घातल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर त्यातील २ आरोपी कोरोनाची लागण झाली त्यांना जिटी रुग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अन्य आरोपी यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
जिमीत अमित पांचाळ, अपूर्व जयशेभाई गोहिल, भाविक धर्मेश पडियार, सागर केशवजी गाला आणि निसर्ग तुषार मस्कारिया अशी आरोपीची नांवे आहेत.
अंधेरीतील व्यापाऱ्यांकडून आरोपीने ७७ हजार रूपायांची महागडी सिगारेट खरेदी केली. त्याचे पेमेंट पेटीएम द्वारे केल्याचा बनाव आरोपीनी करून पेमेंट झाल्याचा खोटा मेसेजही पाठविण्यात आला. प्रत्यक्षात पेमेंट झालेच नव्हते. म्हणून व्यापाऱ्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता ओशिवरा पोलीसानी आरोपी विरोधात भादवी ४२०,४६५,४६७,४७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या पथकातील रघुनाथ कदम, तुषार सावंत,दयानंद साटम, लक्ष्मण बागवे, विनोद माने, किरण बारसिंग, उमेश सोयकें, कमलहक शेख,मनीष सपकाळ,संग्राम जाधव यांनी कडून चौकशी करीत आरोपीना चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरोपींनी यांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्यात दोन आरोपींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांना उपचारासाठी जिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले
रिपोर्टर