भरधाव दुचाकी चालकाने मेट्रो संरक्षक पत्र्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू

मुंबई (जीवन तांबे) : चेंबूर येथील सायन ट्रोमबे मार्गावरील आचार्य उद्यान जवळील मेट्रो संरक्षक पत्र्याला एका भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. विष्णू जनार्धनव मापलेकर  वय ५३ असे या मृत्यू व्यक्तीचे नांव आहे.

विष्णू मापलेकर आपल्या एम. एच - ०३ सी. एन - २२०४  या दुचाकी वरून सायन ट्रोमबे मार्गे वाशीच्या दिशेने भरधाव वेगाने गाडी चालवीत  असताना दुचाकी जेव्हा डायमंड गार्डन जवळील योगी हॉटेल आली असता अचानक दुचाकी वरील त्याचा ताबा सुटून दुचाकीने मेट्रोच्या संरक्षक पत्र्यांना ठोकली. त्यात दुचाकीस्वार मापलेकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. चेंबूर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे

संबंधित पोस्ट