मोहम्मद रफी यांच्या लोकप्रिय गीतांची रूहानियत संगीत मैफल संपन्न

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच  दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.त्याच अनुषंगाने सिंफनी म्युझिकल गृप आणि सोलफूल सॅटरडे प्रेझेंटस् रूहानियत या लेजेंड गायक मोहम्मद रफी यांच्या लोकप्रिय गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली .निर्माती ट्रिझा डिसुझा यांच्या संकल्पनेतून साकारलेली लेजेंड गायक मोहम्मद रफी यांच्या अविस्मरणीय लोकप्रिय हिंदी गीतांची रुहानियत ही सुरेल संगीत मैफल सोलफुल सॅटरडे होमबाॅंड डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आनलाईन सादर करण्यात आली. राजेश सुब्रमणियम यांच्या सोलफुल सॅटरडे आणि निर्माती ट्रिझा डिसुझा यांच्या सिंफनी म्युझिकल गृपने सादर केलेल्या इमाॅर्टल हिट्स आफ मोहम्मद रफी रूहानियत या आनलाईन कार्यक्रमात कुमार सुब्रमणियम आणि जगदेस्वरम सुब्रमणियम या गायकांनी हिंदी चित्रपटातील मोहम्मद रफी यांची गाजलेली मधुर  गीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन राजेश सुब्रमणियम यांनी केले. या यशस्वी आनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला . तसेच या कार्यक्रमाचा असंख्य रसिकांनी राजेश सुब्रमणियम यांच्या फेसबुक लाईव्ह पेज वरून आणि यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला. या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर ट्रिझा डिसुझा व राजेश सुब्रमणियम यांनी सोलफुल सॅटरडे होमबाॅंड डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन हिंदी चित्रपटातील सुरेल गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल संगीताचा नजराणा देण्यासाठी सिंफनी म्युझिकल गृप आणि सोलफूल सॅटरडे सदैव प्रयत्नशील राहील असे मनोगत व्यक्त केले .

संबंधित पोस्ट