
महाड च्या इमारत दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ६४ लाख रूपये
- by Reporter
- Sep 04, 2020
- 513 views
मुंबई (प्रतिनिधी) : महाड जि. रायगड येथे दि. २४ ऑगस्ट २०२० रोजी तारिकगार्डन ही ५ मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमधील १६ मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना/वारसांना ६४ लाख रुपयांचा इतका निधी मदत व पुनर्वसन विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे
हा निधी वितरीत करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांना देण्यात आला आहे. मदतीची रक्कम मयत व्यक्तीच्या वारसांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
रिपोर्टर