फेसबुकवर आक्षेपार्ह मेसेज : कल्याणमध्ये एकाला झोडपले

डोंबिवली (प्रतिनिधी) : कल्याण-शिळ रोडला नेतीवली येथिल नर्मदा अपार्टमेंटमध्ये राहणारा कुलदीप बलजीत सिंग (३१) हा तरूण नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची कार धुण्यासाठी गुरुवारी अडीचच्या सुमारास लोकग्राम सर्कलवरील तिसाई सर्व्हिस कार सेंटरमध्ये गेला होता. तेथे यश आव्हाड आणि कल्पित कांबळे हे दोघे आले. तू बलराज शेट्टी भाईको फेसबुकपे उलटा क्यू बोला, असा जाब विचारत या दुकलीने कुलदीप सिंग याच्या डोक्यात सोबत आणलेल्या अवजड हत्याराने प्रहार केला. त्यानंतर खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. बलराज शेट्टी भाईके बारेमे कुछ बोलना नही, वर्ना तुझे वापस मारेंगे, अशी धमकी देऊन यश आव्हाड आणि कल्पित कांबळे या हल्लेखोरांनी पळ काढला. जखमी कुलदीपच्या जबानीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून फौजदार दत्तात्रय गोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

संबंधित पोस्ट