शिवयोगी,नाथस्वरूप स्वामी श्री.उल्हासगिरी महाराज यांचे प्रेरणादायक प्रवचनाचे आयोजन!

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पाटथर येथील स्वामी गगनगिरी महाराज संत्सग केंद्राचा द्वितीय वर्धापनदिनानिमित्त श्री.सत्यनारायण महापुजेचे भव्य आयोजन गुरूवार दिनांक  १६ मे रोजी करण्यात आले असून त्या निमित्ताने पुजेस्थानी भजन, पादुकावर अभिषेक-पुजन, साधु-संताचे पाद्यपूजन, श्री.सत्यनारायण महापुजा नामस्मरण आदि धार्मिक कार्यक्रमाबरोबरच ओणी आश्रमाचे मठाधिपती  श्री.उल्हासगिरी महाराज यांचे सकाळी ११ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होईल!

  याप्रसंगी श्रीक्षेत्र बुरंबाळी आश्रम(तुळशी तलाव) राधानगरी चे प्रमुख श्री.सदानंदगिरी महाराज, झांजूचं पाणी ( दाजीपूर  ) येथील श्री.दिपकगिरी महाराज तसेच जगविख्यात श्रीक्षेत्र गगनगडाचे ट्रस्टी  श्री.संजयसिंह पाटणकर उर्फ पाटणकर सरकार हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून गोवा येथील हभप.श्री.अनंतगिरी पुजारी, यांचे पौरोहित्याखाली सदर कार्यक्रम संपन्न होईल.

तरी वरील सर्व कार्यक्रमास व स्वामी गगनगिरी महाराजांचे नामस्मरणास सर्व गगनगिरी भक्तांनी आवर्जून उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावेत, असे आवाहन स्वामी गगनगिरी भक्त श्री.प्रकाश परब(मारूती मंदिर जवळ) तसेच बापू धुरी,लवेश परब,नवनाथ परब व विजय परब   यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट