
तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ७ महिलांचा मृत्यू
- by Reporter
- Sep 04, 2020
- 563 views
तामिळनाडू (प्रतिनिधी) : तामिळनाडूतील कुड्डालोरमधील फटाक्यांच्या एका कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू झाला आहे. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना कुड्डालोर जिल्ह्यातील कट्टूमन्नारकोली भागात घडली आहे. हे ठिकाण चेन्नईपासून १९० किलोमीटर अंतरावर आहे. दिवाळी सणासाठी फटाक्यांची मोठी मागणी असते. त्यासाठी सकाळी फटाक्याच्या कारखान्यात संबंधित मालक, त्यांची मुलगी आणि सात महिला उपस्थित होत्या. याच दरम्यान कारखान्यात स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यात सात महिलांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात काम सुरु करण्यापूर्वी पूजा सुरु होती. याच दरम्यान स्फोट झाला. यावेळी पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिलांनी रुग्णालयात नेल्यानंतर प्राण सोडला. संबंधित कारखान्यात ३० वर्षापासून फटाक्यांची निर्मिती केली जात आहे. गेल्या आठवड्यात या कारखान्याच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रिपोर्टर