रक्तदान व प्लाझ्मादान नोंदणी शिबिराचे आयोजन
- by Adarsh Maharashtra
- Sep 03, 2020
- 2015 views
मुंबई (शेखर भोसले) म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या काळात प्रथमच डी विभाग महानगर पालिका कार्यालयात रक्तदान व प्लाझ्मादान नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड व शिवसेना पुणे संपर्कप्रमुख सुनिल कदम यांच्या हस्ते झाले.
यावेळी रक्तदान करणारे सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुशिल बडेकर व इतर रक्तदात्यांचा सत्कार युनियनचे पदाधिकारी आनंद गांवकर यांच्या हस्ते करण्यात आला. सदर शिबिरास पालिका कामगार, कर्मचारी व इतरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नगरसेविका अरुंधती अरुण दुधवडकर, नगरसेविका मीनल पटेल, शाखाप्रमुख संतोष सकपाळ, सखाराम जाधव व इतर कार्यकर्त्यांनी या रक्तदान व प्लाझ्मादान नोंदणी शिबिरास उपस्थिती लावली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम