पत्रकार पांडुरंग रायकरांचा मृत्यू मुर्दाड भ्रष्ट सरकारी यंत्रणेचा बळी!

मुंबई (प्रतिनिधी) : पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हा सर्वसामान्यांच्या पैशावर मजा मारणाऱ्या सरकारी यंत्रणेने केलेला मोठा गुन्हा आहे. या गुन्हयाची मागील पानावरून चौकशीही होईल, दोन-चार जण काही काळापुरते निलंबित होतील. राजकारणी राजकारण खेळतील.पण पुढे काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहील अशी खंत सामाजिक कार्यकर्ते दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.
          
आता अनलॉक-४मुळे यदाकदाचित कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील ३ महिने धोक्याचे सांगितले जात आहेत.त्यातच राजकारण्यांचा प्रसिद्धीसाठीचा अतिउत्साहीपणा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर घाला घालू शकतो.मुर्दाड यंत्रणा झाली असल्याने असे अनेक पांडुरंग जीवाशी गेले तरी मुर्दाड यंत्रणेस काही फरक पडणार नाही. जोपर्यंत जबाबदार यंत्रणेवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन कारवाई होणार नाही.
          
सोयीचे राजकारण करत आरोप-प्रत्यारोप करणारे संधी साधतील. उठसूठ राजकारण करणारे आता गप्प आहेत. सूतकी चेहरे करून नाटकी अश्रू ढाळणारे गायब झाले आहेत. आता शोक संदेशांचा पाऊस पाडला जाईल. सरकारी तिजोरीतून मदतही जाहीर केली जाईल;पण जगाचा निरोप घेतलेले परत येणार काय?एका पत्रकाराला वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नसतील,तर सर्वसामान्यांची काय

अवस्था?सरकारी पैशावर सुविधा मिळविणाऱ्या राजकारण्यांना तातडीने सर्व सुविधा मिळू शकतात,पण एका सर्वसामान्य पत्रकाराला सुविधा न मिळाल्याने मृत्युला कवटाळावे लागावे ही भ्रष्ट सरकारी यंत्रणेची शोकांतिका म्हटली पाहिजे;अशा तीव्र शब्दात दीपक शिरवडकर यानी आपल्या भावना व्यक्त केल्या आता थातुरमातुर उपाययोजना केल्या जातील.

संबंधित पोस्ट