
पंढरपूर एस.टी.स्थानकात मोकाट कुत्री,भिकारी यांचा मनसोक्त वावर.
- by Reporter
- Sep 03, 2020
- 504 views
मुंबई (भारत कवितके) : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काळ चालु असून या काळात पंढरपूर येथील भव्य अशा एस.टी.स्थानकात बेवारस भिकारी लोकांचा सर्रास वावर असल्याचे किळसवाणी चित्र पाहयला मिळते.येथील महमंडळाचेही कर्मचारी या बाबत काहीही कार्यवाही करीत नाहीत.चौकशी कक्षाला या बाबत कळविले तर काहीच उत्तर मिळत नाही.जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येते.प्रवासी बसण्याच्या बाकावर भिकारी ऐसपैस झोपलेले,बसलेले ,काही तरी खाताना आढळतात.खाऊन झाले की खरकटे तेथेच अस्ताव्यस्त फेकतात,बाका खाली त्यांचे सामानही अस्ताव्यस्त स्थितीत विखुरलेले असते.प्रवाशांना आरोग्याच्या द्रुष्टीने हे घातक आहे.हे अपायकारक असूनही महामंडळ याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते आहे.तसेच प्रवाशी बाकावर मोकाट कुत्री ही आपला सर्व विधी तिकडेच उरकतात.आवारात मोकाट गाढवांचाही मुक्तपणे समुहा- समुहाने संचार चालू असतो .एक तर भिकारी भयानक दुर्गंधीयुक्त जखमेवरील माशा हाकलत बसलेला असतो.प्रवाशांच्या अशा मुक्त वावरामुळे नुकत्या सुरू झालेल्या एस.टी.च्या प्रवाशांना हे पाहवत नाही.कोरोनाच्या संकटाची धास्ती घेतलेले प्रवाशी इच्छीत स्थळाकडे जाण्यासाठी येथे अल्पसा प्रतिसाद देत आहेत.महामंडळाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून निरसन करावे.व प्रवाशी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे
रिपोर्टर