पत्रकार "पांडुरंग रायकर मृत्यू" आरोग्य मंत्री राजेश टोपेंना घरी पाठवा, मुख्यमंत्री आणि बाकीच्या मंत्र्यांनी आत्ता घरा बाहेर या: किरीट सोमैया
- by Adarsh Maharashtra
- Sep 02, 2020
- 1017 views
मुंबई : पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांना एमब्युलन्स वेळेवर न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला. हे अत्यंत दुदैवी असून अद्यापही राज्यातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा वेळेवर मिळत नाहीत. लोकांना जीव गमवावे लागत आहेत. हे सर्व पाहता राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना राजेश टोपेंना आता घरी पाठवा, आणि मुख्यमंत्री व बाकी मंत्र्यांनी घराबाहेर पडा अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांनी दिली आहे.
राज्यात अद्यापही एमब्युलन्सच्या सुविधा मिळत नाही, आयीयूमध्ये बेड उपलब्ध होत नाही, हॉस्पिटल भरमसाठ बीलं लावत आहेत. रेमडेसिविर टोसिली झुमाब सारख्या औषधांची टंचाई आहे, अशी सध्याची राज्याची कोवीडची स्थिती आहे. ठाकरे सरकार कोवीडचे संकट हाताळण्यात पूर्णत: असफल ठरली आहे. राज्याला कोरोनापासून वाचवायचं असेल तर ठाकरे सरकारने स्टंटबाजी थांबवली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सोमैया यांनी दिली आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम