उपनगरातील विविध परिसरांमधून वाहने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चेंबूर पोलिसांनी केली अटक

मुंबई (जीवन तांबे) : मुंबईतील शहर व उपनगरातील विविध परिसरांमधून वाहने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीवर शिवाजी पार्क, पंतनगर व आरसीएफ पोलीस ठाण्यामध्ये दुचाकी चोरी चे गुन्हे देखील दाखल आहेत. पोलीस बऱ्याच दिवसांपासून मी

आरोपीचा शोध घेत होते. नरेंद्र कडू उर्फ नायडू (२०) असे या आरोपीचे नाव असून तो चेंबूरच्या आरसीएफ येथील विष्णु नगर परिसरात राहतो. २ ऑगस्ट रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात एका रिक्षाचालकाने रिक्षा चोरीला गेली असल्याची तक्रार दिली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि ओलेकर,पो उप नि प्रदीप पाटील व पो ह जाधव, साळुंखे, पो शी पवार,पाटील, सुधीर माने ,प्रदीप माने यांनी शोध घेतला असता पोलिसांना चोरीला गेलेली रिक्षा सापडली. याप्रकरणी त्यांनी एका संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने रिक्षा चोरल्याचे कबूल केले. यावेळी चेंबूर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अजून तीन गुन्ह्यांमध्ये देखील त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

यावेळी पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या मोटार सायकल, रिक्षा व ४ मोबाईल हस्तगत केले.
या आरोपीवर आरसीएफ, खार व चेंबूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.

तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षका शालिनी शर्मा व पोलीस अधिकारी आरोपीची अधिक चौकशी करीत आहे

संबंधित पोस्ट