लोअर परेल मध्ये गेल्या ४० वर्षांपासून साजरा करत आहेत इको फ्रेंडली गणेशोत्सव
- by Adarsh Maharashtra
- Aug 31, 2020
- 1466 views
मुलुंड (शेखर भोसले) मागील काही वर्षांपासून वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होत आहे त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लोअर परेलमधील रुस्तम बिल्डिंगमधील रहिवासी गेल्या ४० वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत असून येथे निसर्गाचा राजा श्री गणेशाची प्रतिमा भींतीवर रेखाटण्यात येते. तसेच उत्सवाचा समारोप आणि विसर्जन पूर्णपणे इको फ्रेंडली पद्धतीने करण्यात येते. लोअर परेलमधील रुस्तम बिल्डिंगमधील मागील ४० वर्षांपासूनच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या परंपरेबद्दल बोलताना येथील रहिवासी सदानंद कानेकर यांनी सांगितले की, सुरुवातीला रुस्तम बिल्डिंगमधील रहिवासी महादेव कांदळगावकर यांनी एका छोट्या काळ्या फलकावर बाप्पांचे चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी या बिल्डिंगमधील सुधीर सावंत यांनी नंतर पुढाकार घेतला. रहिवाशांचा उत्साह आणि श्रद्धा पाहून सुधीर सावंत यांनी हा गणपती भिंतीवर साकारण्यास सुरुवात केली. ४० वर्षे झाली तरी ही परंपरा सुरु आहे. सुधीर सावंत यांचा मुलगा शार्दुल सावंत गेल्या 3 वर्षांपासून गणपतीची प्रतिमा भींतीवर रेखाटत आहे. ना आगमनाचा खर्च, ना विसर्जनाचा, ना कोणती वर्गणी यामुळे रुस्तम बिल्डिंगमधील या बाप्पाला निसर्गाचा राजा म्हणून ओळखले जाऊ लागलेय. या इको फ्रेंडली बाप्पाचे विसर्जनही इको फ्रेंडली पद्धतीने केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी येथे अर्पण करण्यात आलेल्या नारळांतील पाणी या गणपती बाप्पाच्या प्रतिमेवर शिंपडले जाते. गणपतीच्या प्रतिमेवर शिंपडलेले हे पाणी एका बादलीत जमा केले जाते आणि नंतर बिल्डिंगमधीलच तुलसी वृंदावनात टाकले जाते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम