जिल्हाबंदी उठली; महाराष्ट्र शासनाची अनलॉक ४. ची नियमावली जाहीर; ई-पासची गरज नाही

मुंबई (प्रतिनिधी) : मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली.

खासगी बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली.  खासगी कार्यालयात तीस टक्के उपस्थितीसह काम करता येईल. ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार. मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावरील बंदी. लग्नाच्या कार्यक्रमांना ५०, अंत्यसंस्कारांसाठी २० व्यक्तींनाच परवानगी.  सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एन्टरटेन्मेंट पार्क बंद राहणार.
याबरोबरच सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. शक्य तितक्या प्रमाणात वर्क फ्रॉम होमच्या पर्यायाचा वापर करावा असे सूचवण्यात आले आहे. सर्व सार्वजनिक स्थळांवर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायजर्स आणि हँडवॉश उपलब्ध करुन देण्याबद्दलही उल्लेख यात केला आहे.

‘या’ गोष्टी बंदच : सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम,आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, मेट्रो सेवा, सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम इत्यादी गोष्टींवर बंदी कायम आहे.

संबंधित पोस्ट