वाढीव वीज बिला विरोधात वंचितचे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

मुलुंड (शेखर भोसले) : कोरोना सारख्या आजाराच्या महामारीत जनतेचे हाल झाले असून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यामुळे बहुतेक जणांवर उपासमारीची वेळ आली असताना भरमसाठ विजेचे बिल पाठवून महावितरण जनतेचे हाल करीत असून या कोरोनाच्या संकटात सापडलेल्या  जनसामान्यांचे विजबिल शासनाने माफ केलेच पाहिजे  अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडी, मुलुंड विधानसभेने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता मुलुंड पश्चिम येथील काळा गणपती मंदिर, मुलुंड कोर्ट येथून सिमेंट कंपनी येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून तेथील अधिकाऱयांना निवेदन दिले व लॉकडाउन काळातील सर्व महिन्याचे घरगुती वीजबिल माफ करण्याची जोरदार मागणी करत परिसर दुमाणून सोडला. वंचित बहुजन आघाडी, मुलुंड विधानसभेचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट