
मुलुंड मध्ये रिक्षात आढळला बेवारस मृतदेह
- by Reporter
- Aug 31, 2020
- 863 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंडच्या देवीदयाल रोडवर एका रिक्षामध्ये एक बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गजबजलेला परिसर असलेल्या या रस्त्यावरून जाणाऱया पादचाऱयांना पहाटेच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या रिक्षात एक निपचित देह पडलेला दिसल्याने मुलुंड पोलिसांना याची तातडीने माहिती देण्यात आली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहचून रिक्षाची पाहणी करून रिक्षातील व्यक्तीची तपासणी केली असता सदर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याला बाजूच्याच अग्रवाल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
सदर व्यक्ती कोण आहे व रिक्षात कोठून आली हे अद्याप समजले नसले तरी पोलिस याचा अधिक तपास करीत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
रिपोर्टर