अनाथ प्रेम सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित विशेष सभा संपन्न

मुंबई (प्रतिनिधी) : ३० रोजी  मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री.मुरारीलाल पाथरे यांच्या मुंबई कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या आयोजित केलेल्या विशेष सभेचे अध्यक्ष स्थानी सौ.मायादेवी मुरारीलाल पाथरे यांनी केले.
              
सभेच्या ठिकाणी अनाथ प्रेम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विनायक कांबळे व सहसचिव मुकेश वराळ यांच्या वतीने श्री.मुरारीलाल पाथरे यांच्या विशेष सत्कार पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.तसेच त्यांनी कोरोनाचा सावटाखाली पाच महीने मुंबई बंद असताना , व.अनेक कुटुंबांवर उपासमारी वेळ आली असताना त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.त्यांच्या धाडसी कार्याची दखल घेऊन त्यांना संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले.
         
त्यानंतर सर्व अनाथ प्रेम सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व पत्रकार कार्यकर्त्यांची जबाबदारीचे भाषने झाली. तसेच मुरारी लाल यांनी सौ.मंजू जैन यांची मुंबई महिला अध्यक्ष , सौ.मंजूळा चिप्पा यांची मुंबई महिला सचिव , आणि सौ.ज्योती राणा यांची मुंबई महिला खजिनदार या पदासाठी निवड करण्यात आली .त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
             
या सभेत नंदकुमार बाबर, अरूण शेलार, गुरुनाथ शेळके, नंदकुमार नामदास, आदित्य राणा,माया इंगोले,  नेत्रा इंगोले, मंजू जैन, ज्योती राणा, मंजुळा चिप्पा , महादेव देवेंद्र, शंकर इंगोले आदि मान्यवर उपस्थित होते.मुरारीलाल यांनी आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.तसेच सूत्रसंचालन हनुमंत चव्हाण यांनी केले.

संबंधित पोस्ट