पवईत चाळीतील घराला आग स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली

मुंबई (पंकजकुमार पाटील) : जगभरात गेली चार महिने असलेल्या कोरोनाचे सावट आणि हातचा  रोजगार बंद असल्याने बरेच कुटुंब आपले परिवारासहित गावी गेले असता. पवईतील चैतन्य नगर विभागातील पंचशील निवास सोसायटी लगत असलेल्या प्रदिप भोगल हे आपल्या परिवारासह राहत होते.
 
परंतु लॉकडाऊन कालावधीत ते एका महिन्यापूर्वी उस्मानाबाद येथे आपल्या मुळ गावी गेले होतो.

अचानक घरातील फ्रीज मध्ये शॉर्टसर्किट होऊन बंद घरातून धुराचे लोट बाहेर येत होते.  आसपासच्या रहिवाशांना निदर्शनास आले त्यानंतर स्थानिकांनी प्रसंगावधान राखत बंद घराचा दरवाजा उघडून घरातील विद्युत वाहिनी बंद करत गॅस सिलेंडर तात्काळ बाहेर काढून मोठी दुर्घटना होण्यापासून टळले. स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत मदत कार्य केल्यामुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
    
घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल व पोलीसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सध्या कोरोनाचे सावट असताना कोणीही कोणाच्या घरी जात येत नसता संकट प्रसंगी या तरूणांनी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट