नागपूरच्या मराठी नाट्य कलावंत संघटनेने कलाकारांना केलेले मदत कार्य कौतुकास्पद आहे. अभिनेते डॉ.विलास उजवणे

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी नाट्य कलावंत संघटना नागपूर यांच्या वतीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील संकट काळात सर्व कलाकारांची कामे बंद होती. पण आपले नाव कुठेही येऊ नये म्हणून कुणीही कलावंत (अपवादाने) आपली अडचण सांगत नव्हता आणि या कठीण परिस्थितीत कसेबसे दिवस काढत होता‌. तेव्हां त्यांच्या मदतीसाठी कोणीही , तसेच कोणतीही संघटना धावुन आली नाही असे विलास उजावणे यांनी सांगितले. एखाद्या सामाजिक संस्थेने कलाकारांना मदत केली असेल तर या संदर्भात काही माहीत नाही, त्याबद्दल त्यांनी क्षमा मागितली . पुढे ते म्हणाले की, या काळात त्यांना फक्त सिंटा (CINTAA) मुंबई या संस्थेच्या वतीने अभिनेता सलमान खान आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी मदत केली ,अन्य कोणीही मदत केली नाही . तसेच गेली ४ वर्षे ते आजारी आहे. तेंव्हाही  सिंटा (CINTAA) मुंबई आणि नागपूरचे आमदार मा.गिरीश व्यास यांनी त्यांना काहीच न मागता आर्थिक मदत केली. तेव्हां मराठी नाट्य कलावंत संघटना या संस्थेची स्थापना झाली नव्हती, नाहीतर मला या संस्थेने निश्चितच मदत केली असती यात मुळीच शंका नाही.तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या काळात अपवाद वगळता कोणत्याही राजकीय वा अन्य कलावंत संघटनांनी सर्व कलाकारांना मदत केली नाही. फक्त "मराठी नाट्य कलावंत संघटना नागपूर" यांनी सर्व कलावंताना आर्थिक मदत केली असे माझे ठाम मत आहे ,आणि हे मत मांडायला त्यांना कोणीही विरोध करू शकत नाही असेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले , मराठी नाट्य कलावंत संघटना नागपूर या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी अनेक मान्यवरांकडे जाऊन त्यांना कलाकारांना मदत करण्यासाठी साकडे घालून,खारीचा आणि सिंहाचा वाटा उचलण्याची जबाबदारी घेण्यास भाग पाडले. ज्यांनी कलाकारांना मदत केली त्यांचे नाव सांगण्यासही त्यांनी मज्जाव केला होता पण त्यांचे नाव  घेतल्याशिवाय ते कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. यात आमचे कलावंत मित्र आहेत जे या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील संकट काळात सुद्धा मदतीसाठी सर्वत्र फिरले आणि कलाकारांना मदत मिळवून दिली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नरेंद्र शिंदे,देवेंद्र दोडके, डॉ.नरेश गडेकर,विनोद देशपांडे,राजेश चिटणीस,संजय भाकरे,विनोद काळे आणि अशा अनेक मान्यवरांचे त्यांनी मनःपुर्वक आभार मानले. व या पुढे देखील तुमचे सामाजिक कार्य असेच उत्तरोत्तर यशस्वी होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना ! अशी हार्दिक शुभेच्छा दिली. असे नागपूरची मराठी नाट्य कलावंत संघटना आणि एक अतिशय उत्कृष्ट सकारात्मक कार्य करणाऱ्या त्या संघटनेच्या सर्व मान्यवरांच्या विषयी अभिनेते डॉ. विलास उजवणे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.

संबंधित पोस्ट