
पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष,अपूर्ण नळपाणी पुरवठा योजने संदर्भात ३सप्टेंबर रोजी उपोषण करणार
- by Mahesh dhanke
- Aug 30, 2020
- 1696 views
मोखाडा(प्रतिनिधी) मोखाडा तालुक्यातील अनेक नळपाणी पुरवठा योजना ह्या गेल्या कित्येक वर्षांपासून अपूर्ण अवस्तेत रखडल्या आहेत त्यापैकी चास,बेरिस्ते,कारेगाव, गोमघर, सावर्डे अशा गावांमध्ये नळपाणी योजना अपूर्ण अवस्तेत आहेत चास व गोमघर येथे योजनेचे काम सुरू करून पुन्हा निविदा काढण्यात येणार असल्याचे समजते बेरिस्ते योजना निकृष्ठ काम केले आहे .सावर्डे येथे कोणत्याही प्रकारचे काम अद्याप सुरू केले नाही कारेगाव योजना देखील कित्येक वर्षापासून रखडली आहे मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाणी हे मिळालेच पाहिजे पाणी पुरवठा विभाग याबाबतीत फारसे गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे येथील अदिवासी बांधव पाण्या पासून वंचित आहेत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा व लवकरात लवकर योजना सुरु करा अन्यथा येत्या ०३ सप्टेंबर रोजी मोखाडा पंचायत समिति माजी सभापति व विद्यमान सदस्य प्रदीप वाघ आमरण उपोषण करणार आहेत
प्रतिक्रिया: प्रदीप वाघ-माजी सभापती मोखाडा
गेल्या कित्येक वर्षांपासून नळपानी योजना रखडली आहे या संबंधित पाणीपुरवठा विभागाकडे लेखी व तोंडी तक्रार करूनही अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही मि प्रशासनाच्या विरोधात ३सप्टेंबर २०२० रोजी आमरण उपोषण करणार आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम