अजित पवार, जयंत पाटील, तटकरे, मुंडे यांच्यासह ११ जणांना मरिन ड्राईव्ह पोलिसांची नोटीस

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांच्यासह ११ जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी २०१८ मध्ये पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ०२ आॅक्टोबर २०१८ रोजी कलम ३७(१) सह १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मरीनड्राईव्ह पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील खासदार सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांच्यासह अशोक धात्रक, निलेश भोसले, अमित हिंदळेकर, अनिल कदम, किरण गावडे आणि सोहेल सुफेदार या सर्वाना ३१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा. न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन भाजपा - सेना युती सरकार विरोधात आंदोलन केले होते. सदर प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.

अजित पवार आणि अन्य नेत्यांविरोधातील दोषारोप पत्राची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी कामकाजाच्या वेळी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

दरम्यान, सध्याच्या सरकारमधील वजनदार नेत्यांनाच पोलिसांची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तत्कालीन सरकारविरोधातच आंदोलन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असली तरीही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना न्यायालयात उपस्थित राहावं लागणार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट