
विक्रोळीत राहिवाश्यांनी इमारती मध्ये बनवले कुत्रीम तलाव!
- by Reporter
- Aug 28, 2020
- 660 views
मुंबई (जीवन तांबे) : घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींचे थेट समुद्रात विसर्जन करता येणार नाही तसेच पालिकेकडून जागोजागी मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय गणेश भक्तांसाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली आहे परंतु त्याच बरोबर काही ठिकाणी विभागातील रहिवाश्यानी आपल्या परिसरात स्वता कुत्रीम तलावांची निर्मिती केली आहे विक्रोळी पूर्वेला असणाऱ्या कन्नमवार नगर दोन येथील नवीन म्हाडा इमारत क्रमांक ५ याठिकाणी इमरती मधील रहिवासी यांनी इमारती मधील पटांगणात कुत्रीम तलावाची निर्मिती केली तलाव अतिशय सुंदर सजवले असून त्यात इमारती मधील घरगुती बसलेल्या गौरी गणपती बाप्पांचे कुत्रीम तलावात विसर्जन करण्यात आले.
यंदा राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. राज्यात २७ ऑगोस्ट गौरी गणपतीचे विसर्जन झाले असून आज साथ दिवसांचे गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून थेट समुद्रात मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गणेश मूर्तींचे संकलन करा, अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवातील गौरी गणपती विसर्जन सोहळा २७ ऑगोस्टला पार पडला आहे. मुंबईसह राज्यात २२ ऑगोस्टला शनिवारी गणरायाचे साध्या पद्धतीने उत्साहात घरोघरी आगमन करण्यात आले त्यानंतर पहिले दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे गणेश मूर्तींचे विसर्जन झाले.
प्रतिक्रिया : पवन ढगे (रहिवाशी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रोळी विभागत देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे परिसरातील रहिवाश्यांना कोरोना सारख्या या आजाराचा सामना करू लागू नये म्हणून आम्ही आमच्या इमारती मधील पटांगणात कुत्रीम तलावाची निर्मिती केली आहे व त्यात इमारती मधील घरगुती गणपती विसर्जन केले.
रिपोर्टर