
चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी सर्विस मार्गावर मार्गावर खड्डेच खड्डे! एमएमआरडीएचे दुर्लक्ष!
- by Reporter
- Aug 28, 2020
- 1019 views
मुंबई (जीवन तांबे) : चेंबूर येथील एम पश्चिम विभागातील सिद्धार्थ कॉलनी जवळील भुयारी मार्ग समोरील मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या मार्गावर वाहन चालवणे चालकांना मुश्किल झाले आहे.
चेंबूर एम पश्चिम विभागातील सिद्धार्थ कॉलनी ते कुर्ला सिग्नल कडे जाणाऱ्या सर्व्हिस मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
पालिका ठेकेदार या खड्ड्यात खडी टाकून खड्डे भरून निघून जातात परंतु हे खड्डे काही तासात
पुन्हा उखटले जात असल्याने या मार्गावर वाहन चालविताना व सामान्य नागरिकांना चालताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खड्ड्यातील साचलेले पाणी चालत असलेल्या नागरिकांच्या अंगार उडत कपडे डागलेले होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. खड्ड्याला लावलेली मलमपट्टी निघून गेल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात जाऊन नागरिकांच्या पैशांची उधळ पट्टी केलेला खर्च खड्ड्यांमुळे नेमका रस्ता कुठे आहे, असा प्रश्न सामान्य नागरिक व चालकांना पडत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना तसेच वृद्ध, गर्भवतींना येथून चालणे धोक्याचे झाले आहे.
या मार्गावर मेट्रोचे काम सूरू असल्याने या मार्गावर पत्रे लावण्यात आले आहे. तसेच नाल्यात माती गेल्याने या मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. कालच एक महिला बाईक चालवीत असताना तोल जाऊन बाईक सह खड्ड्यात पडली असता किरकोळ जखमी झाली आहे. अशा वारंवार या घडत असताना देखील येथील एमएमआरडीएचे अधिकारी सरर्स पणे दुर्लक्ष करीत आहे.
पडलेले मोठे खड्डे आणि त्याची अवस्था पाहून या कामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा मार्ग पुन्हा नव्याने बनविण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निब्बान शैक्षणिक व सामाजिक ट्रस्टच्या समाजसेविका स्वाती तपासे व स्वानंदी तांबे यांनी दिला आहे.
आशालता कदम : मी चेंबूर मार्ग काही कामानिमित्त कुर्ला स्थानक कडे जात असताना या मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने खड्ड्यामुळे अचानक माझा तोल गेल्याने खाली पडले.
मला साधारण मार लागला.
हे खड्डे जर वेळेत बुजविले गेले नाही तर एखादा बळी जाऊ शकतो. या पालिका व बांधकाम विभाग जबाबदार असू शकतील.
रिपोर्टर