नगरसेवक प्रकाश गंगमुलुंड पश्चिमेतील रहिवासी सोसायटयांना थर्मलगण आणि ऑक्सिमीटरचे मोफत वाटप

मुलुंड (शेखर भोसले) : २७ ऑगस्ट रोजी मुलुंड पश्चिमचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या वतीने विभागातील सोसायटयांना,  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रहिवासी कोरोनासंबंधित अलर्ट राहावेत या उद्देशाने थर्मलगण आणि ऑक्सिमीटरचे मोफत वाटप करण्यात आले. सोसायटीतील रहिवाशांचे तसेच सोसायटीत येणारे पाहुणे, कामगार, सफाई कामगार, दूधवाले, पेपर टाकणारे यासर्वांचे तापमान आणि ऑक्सिजन लेवल चेक केल्याने कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही याची बेसिक माहिती होते व त्यासाठी हे वाटप करण्यात आले.

मुलुंड पश्चिम येथील सुधीर कॉम्प्लेक्समध्ये भेट देऊन नगरसेवक गंगाधरे यांनी येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि कोविड १९ च्या रोगराई विरोधात लढणाऱ्यांसाठी, कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सुधीर कॉम्प्लेक्समध्ये येणार्‍या प्रत्येक भाविकांचे आणि कार्यकर्त्यांचे तापमान तपासण्यासाठी यावेळी थर्मोमीटर आणि ऑक्सिमीटरचे वितरण करण्यात केले. यावेळी भाजपाचे महिला आणि पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट