मुलुंड तहसील कार्यालयात सॅनिटायझर व सॅनिटायझर होल्डिंग स्टँडचे वाटप

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पश्चिम येथील शासकीय तहसील कार्यालयात असलेल्या आधार केंद्रात रोज शेकडो नागरिक आधार कार्ड काढण्यास अथवा त्यातील तांत्रिक बदल करण्यास येत असतात. कोरोना महामारीच्या काळात या शासकीय कामासाठी तेथे येणार्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मात्र सॅनिटायजर किंवा इतर कोणतीही सुरक्षेची साधने उपलब्ध नसल्यामुळे कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक होती. ही बाब लक्षात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी, मुलुंड तहसील कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक अभिजीत क. चव्हाण, मुलुंड विधानसभा कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर व शाखाप्रमुख

संजय दळवी यांच्या माध्यमातून मोफत ५ लिटर सॅनिटायझर व सॅनिटायझर होल्डिंग स्टँड नागरिकांसाठी २८ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देण्यात आला. मुलुंड तहसील कार्यालयातील कर्मचाऱयांनी व सरकारी कार्यालयात येणार्या नागरिकांनी शिवसेनेच्या या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित पोस्ट