
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ईशान्य मुंबईतील पहिल्या अभ्यास केंद्राला मान्यता
- by Reporter
- Aug 27, 2020
- 830 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड खिंडीपाडा येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. के. बी. एड. व डी. एड कॉलेज यांस टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राची मान्यता मिळाली असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ईशान्य मुंबईत अभ्यास केंद्र असलेले हे पहिलेच कॉलेज आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना या कॉलेज संस्थापक, संचालक रमेश खानविलकर यांनी सांगितले की ईशान्य मुंबईतील या पहिल्या अभ्यास केंद्राला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने मान्यता दिल्याने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे खूपच सोयीचे केंद्र होणार आहे व याचा लाभ दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेणाऱया अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे. लवकरच या कॉलेजमध्ये बी.ए, बी. कॉम, एम. ए, एम. कॉम, बी. लिब, एम. लिब, एम. ए.(भाषा), बी.बी.ए. या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ ला लवकरच सुरवात होणार असल्याचे रमेश खानविलकर यांनी यानिमित्ताने सांगितले.
रिपोर्टर