महावितरणने केबल दुरुस्तीसाठी खोदलेला रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत
- by Reporter
- Aug 27, 2020
- 729 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पूर्व येथील बबनराव कुलकर्णी मार्गावरील कानपिळे सदन समोरील रस्ता दोन महिन्यांपूर्वी महावितरणने केबल दुरुस्तीच्या कामासाठी खोदून ठेवला असल्याने सध्या तेथे कचरा जमा व्हायला लागला आहे. त्यामुळे परिसर अस्वच्छ होत आहे तसेच रस्ताच्या कडेने जाणाऱया वाहनांना व पादचाऱयांना देखील या खड्ड्यांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील व्यावसायिक बाळू साटम यांनी सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महावितरणशी संपर्क साधला परंतु महावितरण पालिकेच्या टी वॉर्ड वर जबाबदारी ढकलत असल्याने अद्याप येथील रस्ता दुरुस्ती होवू शकली नाही आहे.
पालिकेचे रस्ता दुरुस्ती खाते व महावितरणने एकमेकांशी योग्य रित्या समन्वय साधून सदर रस्ता तातडीने दुरुस्त करणे आवश्यक होते परंतु यात चालढकल पणा होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे मत बाळू साटम यांनी मांडले आहे. पालिकेच्या दुरुस्ती खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

रिपोर्टर