रस्त्यावर टाकून दिलेल्या नव्वदवर्षीय आजीबाईसाठी माणुसकी आली धावून नातेवाईकांनी जंगलात सोडून दिलेल्या ९० वर्षीय आजी कोरोनामुक्त

औरंगाबाद (प्रतिनिधी) : औरंगाबादेत काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. ९० वर्षाच्या एका आजीबाईना (९०) त्यांच्या नातेवाईकांनीच जंगलात सोडून दिले होते. या ९० वर्षीय आजींना कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बेरोजगारीचे सावट मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. अशाच परिस्थितीत ९० वर्षाच्या वयोवृद्ध आजीला जंगलात सोडून देण्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सदर घटनेमुळे पसिरात मोठी खळबळ देखील उडाली होती.

१८ दिवसानंतर आजीची कोरोनावर मात

शनिवारी ८ ऑगस्ट रोजी हा प्रकार समोर आला होता.आजीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. तब्बल १८ दिवस ९० वर्षीय कोरोना बाधित आजीवर उपचार केल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान आजी कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील त्यांच्या घराचा कोणीही सदस्य त्यांना भेटण्यासाठी किवा घरी घेऊन जाण्यासाठी आला नाही.

आजीला केले वृद्धाश्रमात दाखल

अनेक दिवसानंतर आजीला कोणी बघण्यासाठी किवा घरी घेऊन जाण्यासाठी आला नाही. त्यामुळे ९० वर्षीय निराधार आजीला पोलिसांच्या मदतीने चिकलठाणा जवळील एका वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान औरंगाबाद येथील मदर तेरेसा या वृद्धाश्रमात आता आजीची देखभाल केली जाणार आहे.

संबंधित पोस्ट