चेंबूर मध्ये घराची बाल्कनी कोसळली, एक महिला गंभीर जखमी!
- by Reporter
- Aug 27, 2020
- 649 views
मुंबई (जीवन तांबे) : चेंबूर मोनोरेल्वे स्थानक जवळ असलेल्या महात्मा फूले नगर परिसरातील आज सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी एक मजली घराची बाल्कनी अचानक कोसळल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
तुळसाबाई वामन अंभोरे वय -७० असे महिलेचे नांव आहे. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने वृद्ध महिलेला उपचाराकरिता पालिकेच्या राजावाडी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि महानगरपालिकेचे कर्मचारी दाखल झाले युध्द पातळीवर मलबा उचलण्याचे काम सुरू आहे. लिमेये या विकासकाने या झोपड्पट्टीचे पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे.
१५ मार्च रोजी घरे विकासक घरे खाली करणार होते. परंतु कोरोना मुळे हे काम रखडले आहे.
७० वर्षांपूर्वीची जीर्ण झालेली घरे आहेत.
ही घरे विकासक खाली करणार होता म्हणून या घरांची डागडुजी कोणी केलेली नाही.

रिपोर्टर