
साई मंदिरांसाठी शनिवारी शिर्डीत ‘दार उघड उद्धवा दार उघड’ आंदोलन
- by Reporter
- Aug 27, 2020
- 1744 views
शिर्डी (प्रतिनिधी) : राज्यातील मंदिर पुन्हा उघडी करावी या मागणीसाठी भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीनं शनिवारी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ आंदोलन केलं जाणार आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांसह अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांनी या घंटानाद आंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
खा. सुजय विखे पाटील यांनी म्हणाले,”राज्यातील इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली, मात्र मंदिरं खुली करण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय मागील पाच महिन्यांपासून बंद आहेत.”
“शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर बंद असल्याने येथील अर्थकारण ठप्प झाल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली, तरीही मंदिर सुरू करण्यास राज्य सरकार दिरंगाई का करते? दारूच्या दुकानापासून ते मॉल उघण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात. मग, मंदिरांबाबतच वेळकाढूपणाचे धोरण का?,” असा सवाल सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.
रिपोर्टर