गणपत पाटील नगर लिंक रोडवरील गोयंका शाळेजवळ सिग्नलचे उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : बोरिवली पश्चिमेकडील लिंक रोड,सी.पी.गोएंका शाळेजवळील नाक्यावर आता वाहतूक सिग्नल बसवण्यात येणार आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन अपघाताच्या अनेक दुर्घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. हे लक्षात घेता शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी याठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी केली होती .त्यानुसार न्यू लिंक रोडवरील आय. सी.कॉलनी, सी. पी. गोयंका शाळेजवळील नाक्यावर बसविण्यात येणाऱ्या वाहतूक सिग्नल व्यवस्थेचे उद्घाटन म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी वाहतूक शाखेचे निरीक्षक संपत लोंढे,  एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख राजू इंदुलकर, महिला शाखा संघटक ज्यूडी मेंडोसा, युवा सेनेचे जतीन परमार सहित स्थानिक नागरिक उपस्थित होते.या ठिकाणी वाहतूक सिग्नल लावणार असल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित पोस्ट