सत्तेत असून सुध्दा कामे होत नाही खासदार असून काय फायदा शिवसेनेच्या खासदाराचा राजीनामा

औरंगाबाद (प्रतिनिधी) : सत्तेत असुनही काम होत नाहीत. त्यामुळे खासदारकी काय कामाची. फक्त राष्ट्रवादीचीच कामे होतात असा आरोप करत शिवसेनेच्या खासदाराने बुधवारी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. त्यात त्यांनी राजीनाम्याचं कारण सविस्तर सांगितलं आहे.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी पाठपुरावा करूनही काहीही झालं नाही. त्यामुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारमध्ये असूनही काम होत नाही या अस्वस्थेतून बंडु जाधव यांनी हा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम होत नसल्याची शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा पुरेपूर वापर करत आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्त्यांना ताकद देत आहे. असंही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

संबंधित पोस्ट