लोक बिरादरी जोपासणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे -डॉ.प्रकाश आमटे
- by Reporter
- Aug 26, 2020
- 281 views
गडचिरोली (प्रतिनिधी) : आजच्या विज्ञान युगात ही शिक्षणापासुन बरेच दूर , वंचित असलेल्या आदिवासी समाजाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्रात सदैव अहोरात्र झटून आपल्या बिरादरीला न्याय मिळवून देणारा साहित्यिक नामदेव भोसले हा उद्याचा आशेचा किरण आहे. अशा शब्दात थोर समाजसेवक डाॅ.प्रकाश आमटे यांनी साहित्यिक नामदेव भोसले यांचे कौतुक केले.एका अतिशय गरीब घरातील तरुण आपल्या लहानपणाची दैन्यावस्था पुस्तकात मांडून ते सर्व सोसलेले हाल आपल्या खांद्यावर घेऊन लोकांसमोर मांडत आहे. गोरंगरीब लोकांना गरीबीतुन बाहेर काढण्यासाठी नामदेव भोसले पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कार्यातुन आदिवासीनां न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवित आहेत. तसेच प्रत्येक गावात शांततेने मार्गदर्शन केले आणि त्या गावातील गरीब लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साहित्यिक नामदेव भोसले यांनी अतिशय महत्त्वाचे उल्लेखनीय कार्य केले आहे . नामदेव भोसले केंद्र व राज्य शासनाच्या सर्व प्रशासनाच्या योजनांचा लाभ सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र रात्र प्रयत्नशील असतात. त्याचा फायदा प्रशासन व महसूल , गृह , आदिवासी विभागास वेळोवेळी नामदेव भोसले यांच्या मुळे होत आहे. महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनाच्या व विविध सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने शासन आले आपल्या दारी हा महासमाधान कार्यक्रम आयोजित करण्यात नामदेव भोसले यांचे मोलाचे योगदान आहे ,असे मला वाटते. ज्यामुळे नामदेव भोसले यांना राज्यात चार लाख आदिवासी बांधवाना एकत्रीत आणण्यात यश आले. तसेच तळा गाळातील लोकांना केंद्र व राज्य शासनालचा लाभ मिळाला. त्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणंले . तसेच समाजसेवा करून या शांतीदुताने , गरीब लोकांना कलंकित जीवनातून बाहेर काढले. आदिवासी विषयी साहित्य रुपी पुस्तक लोकांच्या समोर सादर करून साहित्यिक नामदेव भोसले यांनी जी समाजसेवा केली ती निश्चितच आदिवासी समाजातील लोकांना पुढे प्रेरणादायी ठरेल यात मुळीच शंका नाही. नामदेव भोसले भावी काळातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामकाज करुन मानवतेला एका उंच पातळीवर नेतील असे मनोगत डाॅ.प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
हेमलकसा भांमरागड हे गरीबांचे मंदिर आहे , तेथे पिडीतांच्या दुःखात आपला स्वता:चा आनंद वाटुन त्यांचे दुःख आपणं स्वतः घेणारा असा येथील प्रत्येक व्यक्ती हा गडचिरोली व भांमरागड मधील आदिवासी मानवतेसाठी देवा समान आहे.असे मनोगत सुप्रसिद्ध साहित्यिक नामदेव भोसले यांनी व्यक्त केले.
रिपोर्टर