अष्टविनायक मित्र मंडळातर्फे मुलुंडमध्ये मोफत आरोग्य शिबीर

मुलुंड (शेखर भोसले) : शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागातील जनतेसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले होते त्याला अनुसरून बीजेएस आणि एमसीएचआय यांच्या सौजन्याने शिवसेना मुलुंड आणि अष्टविनायक मित्र मंडळ यांच्या वतीने विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर आणि विभाग संघटिका संध्या वढावकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपविभाग प्रमुख सुनिल गारे यांच्या प्रयत्नाने अशोक नगर मधील नागरिकांसाठी बुधवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी इत्यादी साथीच्या आजारावर डॉक्टरांमार्फत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. साधारण १५० नागरिकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराच्या आयोजनासाठी अष्टविनायक मित्र मंडळाचे  अध्यक्ष विजय रोटे, उपाध्यक्ष दुष्यंत गोसावी, सचिव  दिपक गांगुर्डे, खजिनदार विनोद वाघमारे, सहखजिनदार सचिन कदम व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

संबंधित पोस्ट